सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील बत्तीसगाव खोऱ्यातील मळे ता.भोर येथे रविवार दि.२४ सगुणा वनसंवर्धन तंत्राने राजगड किल्ल्याचे वनसंवर्धन अंतर्गत वनविभागाच्या मदतीने २ वनराई बंधारे बांधले.
पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत एक दिवसाच्या श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे काम करण्यात आले.तसेच शेकडो वृक्षांची लागवड केली गेली.वनराई बंधाऱ्यामुळे जवळपासच्या विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होउन शेतीसाठी संरक्षित पाणी व जनावरे तसेच वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.सध्याचे महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती खूप बिकट आहे. या धर्तीवर आत्तापासून योग्य ते उपाय योजना रबावण्याचा एक प्रयत्न केला जात आहे.यासाठी वनविभाग अधिकारी पूजा खंडाळे, व एसव्हीटीचे किरण यादव,श्रीकांत देशमुख यांनी मार्गदर्शन मिळाले.यावेळी सोमनाथ माळी, नवनाथ राठोड ,राजन भिकोले, महेश मैंद,हर्षद हिरगुडे ,शुभम पन्हाळकर ,अनिल देशमुख ,शशिकांत देशमुख, सुरज यादव ,प्रयाग यादव ,साईराज देशमुख ,अंकुश कुऱ्हाडे उपस्थित होते.
COMMENTS