बारामती ! कल्याणी जगताप ! स्वराज्य संविधान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला : एकाच वेळी मराठीसह हिंदी, कन्नड व तेलुगू भाषेत प्रदर्शित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : कल्याणी जगताप
स्वराज्य संविधान चित्रपटाचे चित्रिकरण बारामती परीसरात संपन्न सध्या चित्रपट सृष्टी मध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात असतानाच मराठी चित्रपटांनीही कात टाकली आहेच पण बरेच असे वेगळे प्रयोग केले जात आहेत असाच एक आगळावेगळा मुख्य प्रवाहातील चित्रपट "स्वराज्य संविधान हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे.
       स्वामिनी फिल्म, शशिकला फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून निर्मित होत असलेला  सचिन रणपिसे दिग्दर्शित 'स्वराज्य संविधान ' हा सिनेमा मराठी भाषेसह  हिंदी, कन्नड, तेलुगू भाषेमध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये विविध टिव्ही मालीका व चित्रपटांमध्ये अभिनय केलेले महेश देवकाते, नीता कांबळे तसेच सैराट, मुळशी पॅटर्न फेम सुरेश विश्वकर्मा, देवमाणूस, अप्पी आमची कलेक्टर फेम पुष्पा चौधरी यांच्या वरील प्रसंगांचे चित्रिकरण झाले, साउथ फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध कॅमेरामन फयाज अहमद हे या चित्रपटाचे छायांकन करित असून चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार.
असे बोलता वेळी दिग्दर्शक सचिन रणपिसे यांनी सांगितले. स्वराज्य व संविधान या चित्रपटाची कथा सध्या गुलदस्थ्यात ठेवायची असुन लवकरच चित्रपटाचे आॅफिशियल टायटल प्रोमो रिलिज होणार असुन चित्रपटामध्ये काय दाखवले जाणार असेल हि ऊत्सुक्ता निर्माण झाली आहे.
To Top