मेढा ! ओंकार साखरे ! मेढा पोलीस ठाणे हद्दीतील २७ जणांवर हद्दपारीची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
मेढा : ओंकार साखरे
गणेशोत्सव २०२३ ची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मेढा पोलीस ठाणे हद्दीतील २७ जणांवर हद्दपारीची कारवाई जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी केली आहे. 
         मेढा पोलीस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या आनंदा नारायण निकम रा. मेढा, तन्वीर हमीद पठाण रा. जवळवाडी, आनंदा शंकर सपकाळ, रा.मेढा, सचिन तुकाराम भिसे, रा. सरताळे, नितीन राजेंद्र लोखंडे, रा. कुडाळ, गणेश प्रकाश सावंत रा.मेढा, आनंदा बळीराम बांदल रा. बिभवी, सतीश रामचंद्र आटाळे रा. केळघर, राजेंद्र तुकाराम पवार रा. पानस(पुनर्वसन), मंगेश भरत निकम रा.करंदी, निखिल अर्जुन गावडे रा. खर्शीबारामुरे, सूरज शिवाजी देशमुख रा. बिभवी, सिकंदर हमीद पठाण रा. मेढा, संभाजी रामचंद्र गोळे रा. करहर, सचिन धोंडिबा शेलार  रा.जवळवाडी, सनी विकास कासुर्डे, रा. मेढा, मुन्ना जहांगीर मुंढे, रा.कुडाळ, रमेश अंकुश भिलारे रा. सोमर्डी, शैलेश पांडुरंग देशमुख रा. गांजे, प्रदीप नारायण गावडे रा. रामवाडी, आकाश विठ्ठल आगलावे रा. बिभवी, अनिल किसन दळवी रा.केळघर, नितीन रामचंद्र देशमाने रा.सायगाव, पवनकुमार रामचंद्र वारागडे रा. कुडाळ, अभयसिंह राजेंद्र घोरपडे रा. प्रतापगड कारखाना कुडाळ, अतुल रमेश खटावकर रा.कुडाळ, बबन गणपत धनावडे रा. खर्शी बारामुरे अशा एकूण २७ जणांना मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात २ दिवसाकरिता वावरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी दिले आहेत. याबाबतचा प्रस्ताव मेढा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. संतोष तासगावकर यांनी तहसीलदार जावली यांच्याकडे दाखल केला होता यावरून हि कारवाई करण्यात आली. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सपोनि संतोष तासगावकर यांनी दिली आहे.
To Top