सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (इब्जा) या सराफ संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या निवडी करण्यात आल्या आहेत. उपाध्यक्षपदी संतोष बागडे यांची तर सरचिटणीसपदी सुधीर पोतदार यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या 'इब्जा' संघटनेची विशेष बैठक राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र मेहता, राज्याध्यक्ष हरेश, केवलरामाणी यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी निवडी जाहीर केल्या. याप्रसंगी किशोर शहा, रोहित सराफ उपस्थित होते. इब्जाच्या संचालकपदी निवडी पुढीलप्रमाणे : अमृतराज मालेगावकर (पुरंदर), गोकुळ लोळगे (बारामती), रुपाली शहाणे (आंबेगाव), दिनेश लोळगे (दौंड), गणेश मैड (माळशिरस), रघुनाथ बागडे (बारामती), अजय डहाळे (बार्शी), विक्रम ओसवाल (कराड), सचिन देवरूखकर (इचलकरंजी), विजयकुमार भोसले (कोल्हापूर), रणजित विश्वास (सांगली), जितेंद्र बेंदूरकर (सांगली), महेश ओसवाल (बारामती).
तर कायदेशीर सल्लागार म्हणून गणेश आळंदीकर यांची निवड झाली.