सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे.
गुळुंचे ता. पुरंदर येथे आज विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळावा म्हणून तसेच रक्ताच्या विविध आजारांवरील तपासण्या मोफत करता याव्यात म्हणून यासाठीचा आयोजित करण्यात आलेला कॅम्प महिला अस्मिता भवन गुळुंचे आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुळुंचे येथे लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
हे शिबिर शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ ज्युबिलंट भारतीय फाउंडेशन व हकदर्शक यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला. रक्ताच्या विविध तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्र निरा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुळुंचे यांच्या मार्फत करण्यात आल्या.
गुळूंचे कर्नलवाडी आणि पंचक्रोशीतील जवळजवळ दीडशे महिला आणि पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या याशिबिराचे आयोजन करण्यात आशाबी शेख अध्यक्ष इंदिरा महिला आधार केंद्र महाराष्ट्र सुनिता भादेकर साधना निगडे, पुजा फरांदे, पुनम फरांदे आणि वैशाली फरांदे तसेच ज्योतिर्लिंग महिला ग्रामसंघातील प्रत्येक बचत गटातील महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवुन शिबीर यशस्वी होण्यात मोलाची भुमिका पार पाडली.
यावेळी आरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग उपकेंद्र - गुळुंचे आणि प्रा. आ केंद्र निरा येथील
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. समिक्षा कांबळे, आरोग्य सहाय्यक सहाय्यिका बाळासाहेब भंडलकर, तांबे म्हेत्रे तसेच आरोग्य सेविका नेवसे, आरोग्य सेवक मुलाणी नेवसे मुलमुले, प्रयोग शाळा तंत्रज्ञ काकडे, प्राजक्ता म्हेत्रे (ग्रामीण रुग्णालय जेजुरी) कर्ण रणदिवे (प्रा. आ. के निरा) आशा कार्यकर्ती मिना निगडे,. मनिषा निगडे शारदा निगडे मासुम संस्था-सेविका- माधुरी मेमाणे, मंगल मगर यांनी विविध तपासण्या पार पाडल्या.
तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी ज्युबिलंट भारतीय फाउंडेशन आणि हकदर्शक चे अडसुळ सायली पुंडे , विशाल खरात आणि त्यांच्या स्टाफने काम केले. या शिबिराचे आयोजन कोमल निगडे
उपाध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुरंदर यांनी केले.
----------------------
ज्यावेळी मी आरोग्य संबंधित सरकारच्या काही योजना यांच्यापर्यंत यांच्या पर्यंत जाऊन सांगितल्या आणि ज्यांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते नाही त्यांना शंभर रुपयात खाते काढून मिळेल असे सांगितल्यानंतर या सर्व लोकांनी उपस्थित राहून शिबिराला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्यामुळे मला वाटले या महिलेच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन व्हावे.
कोमल निगडे : उपाध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुरंदर तालुका
COMMENTS