सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली प्रतिनिधी(धनंजय गोरे )
गाव करील ते राव काय करील या म्हणी प्रमाणे आनेवाडी ता. जावली येथील ग्रामस्थांनी एकीची वज्रमुठ दाखवीत आनेवाडी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांचे हस्ते मंगळवार ५ सप्टेंबर रोजी आनेवाडी येथे सायंकाळी ठीक ६.३० वाजता करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली
राजकारण म्हंटले कि गट तट आलेच याला आनेवाडी गाव देखील अपवाद न्हवते मात्र गेल्या काही दिवसापासून आनेवाडी गावातील युवक तसेच ज्येष्ठ यांनी एकत्र येत या गोष्टीना मागे टाकत गावचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नियोजन बद्ध कार्यक्रम करण्याचे ठरवून आनेवाडी गावातील गुणवंत विदयार्थी सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार तसेच शिष्यवृत्ती वाटप यासह खासदार अमोल कोल्हे यांचे व्याख्यानाचे आयोजन केले आहे
यासाठी आनेवाडी गावातील लोकनेते स्वामींआण्णा फरांदे सोशल फॉउंडेशन, महाराष्ट्र भूषण पुंडलिक फरांदे प्रतिष्ठान, श्री गणेश क्रीडा मंडळ, भैरवनाथ विकास मंडळ, भैरवनाथ व्यायाम मंडळ, प्रिन्स ग्रुप, श्री संत सावतामाळी नवरात्रौत्सव मंडळ, पंचशील मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले असून या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांनी व आनेवाडी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे