सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात नवनवीन उद्योगाच्या माध्यमातून नावलौकिक वाढविणाऱ्या युवा उद्योजकांचा भोर येथील राजगड ज्ञानपीठाचे फार्मसी कॉलेजच्या सभागृहात सहारा पॅकेजिंग इंडस्ट्रीज व रोटरी क्लब भोर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगभूषण पुरस्कार २०२३ देऊन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
भोर तालुक्यात चिकाटी, सातत्य, एकाग्रता तसेच पारदर्शकतेच्या जोरावर नवनवीन उद्योजक तयार होत असून तरुण उद्योजकांमुळे भोर तालुक्याचे नावलौकिक वाढत आहे असे प्रतिपादन भव्य रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी आमदार संग्राम थोपटे यांनी बोलताना केले. यामध्ये संपत म्हस्के, हनुमंत वरे, नवनाथ मानकर, दिपक तुपे, संदीप खोपडे, अभिजित बांदल, स्वप्नील चव्हाण, सुर्यकांत वीर,शरद नांगरे, गोरख मानकर, डॉ.सचिन शिवतरे, रोहित डाळ, कुणाल बुदगुडे या उद्योजकांचा सन्मान केला गेला.यावेळी खरेदी विक्री संघ चेअरमन अतुल किंद्रे,माजी जि. प.सदस्य विठ्ठल आवाळे, रोटरीच्या माजी अध्यक्षा सुवर्णा मळेकर,प्राचार्य रमेश बुदगुडे,सरपंच अमर बुदगुडे ,राजगड ज्ञानपीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी रामचंद्र थोपटे, रोटरीचे क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब नवले, नारायण वाघ,
आत्माराम गाडे,युवक युवती उपस्थित होते.