बारामती ! कोऱ्हाळे येथे सकल मराठा समाजाचा नीरा-बारामती रस्त्यावर ठिय्या : कटिंनपुल येथे रस्ता रोको आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे : प्रमोद पानसरे
अंतवाली सराटी येथील शांततामय मार्गाने करण्यात येत असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष माणूस लाटी हल्ला व गोळीबाराचा.. जाहीर निषेध करण्यात आला.‌ मा. मनोज जरांगे पाटील करत असलेल्या उपोषण आणि आंदोलनाला पाठिंबा  जाहीर करण्यात आला.
        मराठा समाजाला ओबीसीचा टक्का वाढवून कुणबी मराठा,  मराठा कुणबी, मराठा असे जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्रभराती मराठा  आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.
ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अमाणूस लाठी हल्ला व हवेत गोळीबार केला. अशा सर्व अधिकाऱ्यांची बडतर्फ करावे.तसेच.राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा..
तालुक्याचे आमदार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा सत्तेवर लाथ मारून राजीनामा द्यावा.
अशा मागण्याचे निवेदन तहसीलदार बारामती यांना सा पोलीस निरीक्षक , सचिन काळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने, हजारो कार्यकर्ते रस्ता रोको ला बसले .
            या प्रसंगी डॉ.दत्ता भरणे, प्रमोद पानसरे,प्रताप काका धापटे, पृथ्वीराज नलवडे, प्रदीप बापू धापटे यांनी निषेध व्यक्त केले.. याप्रसंगी लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, बजरंगवाडी, मिळशिकारेवाडी, थोपटेवाडी, कोर्‍हाळे बुद्रुक या ठिकाणचे समाज बांधव उपस्थित होते..
To Top