Baramati Big Breaking ! भरधाव कारने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडले : दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बारामती येथे शाळेत जाणाऱ्या मुलांना भरधाव कारने चिरडल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीनपैकी दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला.
         ओंकार संतोष खांडेकर आणि रुपेश अमोल खांडेकर अशी मृतांची नावे आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार गावात हा अपघात झाला.
         पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हे तिन्ही विद्यार्थी शाळेत जात असताना पुण्याहून बारामतीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या आय-10 कारने त्यांना धडक दिली.या अपघातात तिन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. . मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आपल्या खासगी वाहनातून तीन विद्यार्थ्यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनपैकी दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
To Top