सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : मनोहर तावरे
बारामतीचे पश्चिम भागात केले अनेक वर्षांपूर्वी सिंगम स्टाईल काम करणारे पोलीस अधिकारी बलवंत मांडगे हे सर्व परिचित होते. त्याच स्टाईलने सध्या नवनिर्मित ‘सुपे’ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील यांची घोडदौड सुरू आहे.
अल्पावधीत बेकायदेशीर दारू मटका, जुगार व चोरटा वाळू व्यवसाय करणाऱ्यांनी या अधिकाऱ्यांच्या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. गेली अनेक वर्ष राजरोस पणे सुरू असलेले गैर व्यवसाय तातडीने बंद करा. अशा सूचना कार्यक्षेत्रातील पोलीस यंत्रणेमार्फत सर्वत देण्यात आले. याबाबत सूचना देऊनही दुर्लक्ष अथवा हे गैरव्यवसाय सुरूच ठेवल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्यासह नवनिर्मित पोलीस ठाण्यातील विशेष पोलीस पथक सक्रिय झाले. सात गावातून सात ठिकाणीच कारवाई करण्यात आलीय. यापुढे दारू विक्री कराल तर याद राखा असा सज्जड दम देण्यात आलाय.
नवीन पोलीस ठाणे अंतर्गत सुमारे 25 गावांचा समावेश असून या संपूर्ण परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे. तुम्ही कायद्याचा आदर करा आम्ही तुमच्या सोबत मदतीला आहोत असा संदेश त्यांनी या भागातील जनतेला दिला. यापूर्वी पोलीस मदत केंद्र व पोलीस ठाण्यात असणारी स्थानिक पुढाऱ्यांची व पोलीस मित्रांची लुडबुड यामुळे संपूर्ण बंद झालीय. सहकारी पोलीस व अधिकाऱ्यांनाही शिस्तीचे धडे दिल्याचे दिल जातात.
यापुढील काळात या अधिकाऱ्याचा करिष्मा कायम असाच राहो. अशी भूमिका समाजातील जनते लोकांनी माध्यम प्रतिनिधींची बोलताना व्यक्त केली.