पुरंदर ! गाडीचा टायर फुटून तीन जण जखमी : नीरा-गुळुंचे रस्त्यावरील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
नीरा : विजय लकडे. 
नीरा-मोरगाव रस्त्यावर निरेपासून मोरगाव च्या दिशेने  जगतापवस्ती नजीक नीरा डाव्या कालव्यावर कोंबडीचे पक्षी वाहतूक करणारा टेम्पो क्र M H 09 FL 5296 या गाडीचा टायर फुटल्यामुळे टेम्पो कॅनॉलच्या संरक्षक कठड्याला धडकून कॅनॉलच्या शेजारी वीस फूट खड्ड्यात कोसळला.           यामध्ये अक्षय पोटे, रोशन भिवंगडे व सागर भिवंगडे. रा. उत्तुर ता. आजरा जिल्हा कोल्हापूर हे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून कोंबडीचे बॉयलर पक्षी भरलेला टेम्पो मोरगाव मध्ये खाली करून परतत असताना नीरा नजीक जगतापवस्ती येथे हा अपघात झाला. घटना घडल्यानंतर स्थानिक युवकांनी प्रसंगावधान राखत गाडीतील तिघांनाही सुखरूपपणे बाहेर काढले  व वाहतूकही सुरळीत चालू झाली कॅनॉलचे संरक्षक कठडे मजबूत असल्यामुळे हा टेम्पो कॅनॉल मध्ये न पडता शेजारील खड्ड्यात जाऊन पलटी झाला व पुढील मोठा अनर्थ टळला. 
To Top