पुरंदर ! विजय लकडे ! नीरेत मराठा समाज एकवटला ! अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जालन्यातील घटनेचा निषेध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------  
निरा : विजय लकडे  
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले  या आंदोलनाचे पडसाद आत्ता शहरासह ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. 
        नीरा ता पुरंदर  येथे अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यातर्फे जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या बांधवांच्या वरील अन्यायाच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ‌. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य माजी सभापती दत्ता चव्हाण. नीरा उपसरपंच राजेश काकडे  माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे ग्रा प सदस्य अनिल चव्हाण संदीप धायगुडे. यांच्यासह मंगेश ढमाल कल्याण जेधे गिरमे वकील  नीरा डावा कालवा अस्तरीकरण समन्वयक महेश जेधे अखिल भारतीय मराठा महासंघाचे असंख्य कार्यकर्ते. व निरेतील जेष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. 
            यावेळी दत्ता चव्हाण राजेश काकडे विराज काकडे अनिल चव्हाण  संदीप धायगुडे  महेश जेधै व अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष सुभाष जेधे  यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका मांडली व सकल मराठा बांधवांच्या व्यथा जनतेसमोर मांडल्या  मराठा आरक्षण मिळवण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा दिला. 
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जेजुरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसारे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनवलकर. नीरा पोलीस  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी. पोलीस नाईक करे. पोलीस पाटील भास्कर नीरा. यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
To Top