सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानच्या सुपे (ता.बारामती) येथील सुपे इंग्लिश माध्यमाच्या शाळेची विद्यार्थीनी वैष्णवी बापुराव खोमणे हीची अमेरिकेतील नासाच्या आठ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
यूएस नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हंट्सविले, अल्बामा येथील यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर येथे प्रशिक्षण कार्यक्रम निवडीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडोर इंटरनॅशनलद्वारे २६ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आली होती.
वैष्णवी खोमणे हिच्या या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त सौ.सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव नीलिमा गुजर, सदस्य किरण गुजर, डॉ.आर.एम.शहा, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज प्राचार्य योगेश पाटील आदींनी अभिनंदन केले.