अभिमानास्पद ! विद्या प्रतिष्ठानच्या कृतिकाने एका मिनिटात मारल्या १७२ किक : इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला घ्यावी लागली नोंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कुलच्या इ. दहावी मध्ये शिकणारी कृतिका विनोद घाटे हिने स्वातंत्र्यदिनानिमित्त हडपसर येथे झालेल्या क्लारा ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये तायक्वांदो या प्रकारात एका मिनिटात १७२ कीक मारून जागतिक विक्रम नोंदवला.       याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी झाली. या स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. 
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी कृतिका घाटे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
To Top