कौतुकास्पद ! विद्या प्रतिष्ठानच्या शौर्यचं भन्नाट कार्य....अवघ्या २.९४ सेकंदात A to Z अक्षरे केली टाईप : इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला घ्यावी लागली दखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी शौर्य शाम गायकवाड याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अनोखा विक्रम नोंदवला शौर्याने २.९४ सेकंदात  A to Z  अल्फाबेट्स वेगाने टाईप करत हा विक्रम पूर्ण केला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सदर उपक्रमाचे आयोजन केले होते.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक शौर्य गायकवाड यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
To Top