सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर ता बारामती येथे एकावर कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कुणाल प्रभाकर सोनवणे वय १७ रा. करंजेपुल ता. बारामती याने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तेजस उर्फ दादू सवाणे, रा. वाघळवाडी शुभम जाधव, सागर पाटोळे व बाबू गायकवाड सर्व रा. करंजे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कुणाल सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीत म्हणटले आहे की, काल ३१/८/२०२३ रोजी दुपारी १२:०० वा. चे सुमारास मी व माझा मित्र रोहित वायकर रा. करंजेपुल ता. बारामती जि.पुणे असे आम्ही दोघे पायी चालत कॉलेजमध्ये जात असताना आम्ही कॉलेजचे बाहेरील कंपाउड जवळ आलो असताना तेथे रोडचे पलीकडील बाजूस माझेशी वाद झालेला तेजस उर्फ दादु सवाणे रा. वाघळवाडी ता. बारामती जि.पुणे हा त्याचे हातात लोखंडी कोयता घेवुन थांबलेला मला दिसला व तो माझेकडे बघत होता तेवढयात तेथे शुभम जाधव, सागर पाटोळे व बाबू गायकवाड हे त्यांचे ताब्यातील मोटार सायकलवरुन टिपलसिट माझे समोर आले व त्यांनी आम्हाला गाडी आडवी लावुन ते तीघेही गाडीवरुन खाली उतरले तेवढयात तेथे तेजस उर्फ दादु सवाणे हा त्याचे उजवे हातातील कोयता घेवुन पळत माझेजवळ येवुन त्याने मला. "आता याला जिवंत सोडायचे नाही. असे म्हणुन मोठ मोठयाने शिवीगाळ, आरडा ओरड केलेने कॉलेजमध्ये येत असलेली सर्व मुले, मुली सैर वैर इकडे तिकडे पळु लागले असता मी देखील राजस्थानी जनावरांचा गोटा असले बाजुकडे पळत गेलो असता ते सर्वजण माझे मागे पळत येवुन त्यापैकी मला शुभम जाधव याने हाताने पकडले व तेजस उर्फ दादु सवाणे याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने उलटे बाजुने माझे कमरेवर, पाठीवर मारहाण करुन दुखापत केली तर शुभम जाधव, सागर पाटोळे व बाबु गायकवाड यांनी मला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यावेळी तेथे कॉलेजचे सिक्युरीटी गार्ड काकडे व माझा मित्र रोहित वायकर यांनी त्यांचे तावडीतुन मला सोडविले त्यानंतर तेजस उर्फ दादु सवाणे याने 'मला तु यावेळी वाचला आहे. तुर जर परत आमचे नादी लागला तर तुला कोयत्याने मारुन टाकीन अशी धमकी देवुन ते सर्वजण तेथुन निघुन गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौजदार दीपक वारुळे, पो ना, अमोल भोसले, पो ना सागर देशमाने, पो ह रमेश नागटिळक करत आहेत.
COMMENTS