Baramati Breaking ! बारामती नजीक कटफळ येथे शिकावू विमान कोसळले

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कटफळ नजीक बारामतीतील विमान प्रशिक्षण संस्थेचे शिकाऊ विमान कोसळले आहे. कटफळ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिकाऊ विमान नेमके कशामुळे कोसळले, त्याची मात्र माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.बारामतीत गेल्या काही वर्षांपासून विमानप्रशिक्षण संस्था त्यांचे प्रशिक्षण कार्यालयचालवत आहेत. बारामतीतील विमानतळाचा त्यासाठी वापर होतो. काही महिन्यांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील एक शिकाऊ विमान कोसळले होते. यावेळी विमानाचे नुकसान झाले होते, मात्र त्यातील महिला पायलट प्रशिक्षणार्थी बचावली होती. ती घटना ताजी असतानाच आता दुसऱ्या एका प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले आहे.
To Top