सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील बाजारवाडी ता.भोर येथील शेतकरी चंद्रकांत विष्णू खोपडे तसेच शंकर रामचंद्र शिंदे यांच्या दुसऱ्या वेताच्या दूप्ती म्हैसी (वय -७) साथीच्या आजाराने(एमडीसी लाल डोळ्यांचा ताप) दगावली असल्याने शेतकऱ्याचे प्रत्येकी ५० हजाराहून अधिक नुकसान झाले.
तालुका दुर्गम -डोंगरी असल्याने शेतीला जोड म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करीत असतात.मात्र हवामानाच्या लहरीपणामुळे पाळीव जनावरांना साथीचे आजार होत असतात.सध्या बाजारवाडी परिसरात पाच ते सहा जनावरे साथीच्या आजाराने त्रस्त होती.त्यांच्यावर खाजगी तसेच शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार केले गेले असून सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र खोपडे व शिंदे यांच्या म्हैसी दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.दरम्यान दूप्ती जनावरे आजारी पडून मृत्यू होत असल्याने धावडी,नेरे, वरवडी परिसरातील शेतकरी चींताग्रस्त आहेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
-----------------
पाळीव जनावरांचाही होतोय हृदय विकाराने मृत्यू
जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊन मृत्यू होण्याचे प्रकार घडत असतात. बाजारवाडी ता.भोर येथील शेतकरी भिकू सोनवा वाघ यांचा बैलगाडीला जुंपलेल्या बैलाला गाडी चालू असतानाच चक्क हृदयविकाराचा झटका आल्याने जागेवरच कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. यात वाघ यांचे ५० हजाराहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.
COMMENTS