सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
शारदीय नवरात्रौत्सव सुरू होऊन पाच दिवस पूर्ण झाले.चार दिवसांवर येवून ठेपलेल्या विजया दशमी(दसरा) मुहूर्तावर भोरच्या बाजारपेठेत लक्ष्मी(केरसुणी) विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.विक्रेत्यांना बाजारभाव जेमतेम मिळत असल्याने नुकसान नाही मात्र फायदाही होईना असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
वर्षातून दोन वेळा दिवाळी आणि दसरा या सणाला पूजनासाठी लक्ष्मी (केरसुणी) खरेदी केली जाते.सद्या दसरा चार दिवसांवर आला असल्याने बाजारपेठेत लक्ष्मी ( केरसुणी) विक्रीसाठी आलेली आहे.प्रती नग ६० रुपये बाजारभाव आहे.मात्र महागाई वाढल्याने केरसुणी बनवण्याचा खर्च वाढला आहे.परिणामी विक्रेत्यांचे प्रती नगमागे नुकसान होत नसले तरी ६० रुपये प्रमाणे विक्री करणे परवडत नाही.मात्र दसरा जवळ येईल तसा बाजारभाव वाढेल प्रती नगला ८० ते ९० रुपये बाजार मिळेल अशी आशा विक्रेत्यांना लागून राहिली आहे.
COMMENTS