सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती विमानतळावरून विमानांचे प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड या कंपनीचे शिकाऊ विमान आज पुन्हा एकदा कटफळ हद्दीत कोसळले.. चार दिवसांपूर्वीच याच कंपनीचे विमान कोसळले होते आज पुन्हा सकाळी सह्याद्री काऊ याठिकाणी ही घटना घडली आहे.. हे विमान कशामुळे कोसळले याची अद्याप माहिती मिळू शकली नाही, मात्र सातत्याने बारामतीमध्ये शिकाऊ विमाने का कोसळत आहेत? याची चौकशी गांभीर्याने व्हायला हवी अशी मागणी आता होऊ लागली आहे.. कारण याच भागामध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत लाखो कामगार या ठिकाणी काम करीत असतात हेच विमान एखाद्या इमारतीवर कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती सुदैवाने हे विमान मोकळ्या जागेवरती कोसळले यामुळे या शिकवू विमान संस्थेचा परवाना रद्द करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.. चार दिवसांपूर्वीच याच कंपनीचे शिकाऊ विमान कोसळले होते यामध्ये विमान दोघेजण जखमी झाले होते..
COMMENTS