सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
नीरा ता. पुरंदर येथे आज दुपारी अडीचच्या दरम्यान बस स्थानकासमोर एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने मृत्यू झाला आहे. बाबासाहेब संतराम मरकड वय ७८ रा. जेजुरी ता पुरंदर असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्षी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार मरकड हे चालत पुणे पंढरपूर रस्त्याने नीरा बस स्थानकाकडे चालले होते. ट्रक क्रमांक एम. एच. १२- इ.एफ.९१५७ या ट्रकची त्यांना धडक बसली. त्यामुळे ते चाका खाली गेले यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. नीरा येथील पोलिस हवालदार संदीप मदने, निलेश जाधव, होमगार्ड बरकडे व स्थानिक युवकांनी यावेळी मदत करून या व्यक्तीचा मृतदेह प्रहारच्या रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मोकाशी करत आहेत. दरम्यान ट्रक चालक ट्रकसह नीरा पोलीस चौकीत हजर झाला आहे.