सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील २५ ते ३० गावांच्या आर्थिक देवाण घेवाणीचा स्त्रोत असलेली बँक ऑफ महाराष्ट्र आंबवडे शाखा स्थलांतरित न होता बँकेचा कारभार जैसे थे राहणार असल्याचे आंबवडे खोऱ्यातील नागरिक व बँक खातेदारांच्या बैठकीत मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलेक्टर यांना दिले.
अनेक दिवसांपासून आंबवडे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भोर शाखेला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू होत्या.मात्र भोर शाखेत बँकचे विलीनीकरण झाले तर आंबवडे खोऱ्यातील बँक खातेदारांना अनेक अडचणी येणार होत्या.या पार्श्वभूमीवर आंबवडे परिसरातील २५ ते ३० गावांमधील बचत गट तसेच खातेदारांनी बँकेसमोर आठवड्यापूर्वी ठिय्या आंदोलन केले होते.या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस भोर तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घेऊन संबधिती विषयावर चर्चा केली.चर्चाअंती उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे कलेक्टर यांना बँक स्थलांतराची स्थगिती देण्याचे आदेश दिले.यावेळी मोहन बांदल, संदीप खाटपे ,अनिल धोंडे आदींसह आंबवडे खोऱ्यातील नागरिक उपस्थित होते.
COMMENTS