सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव
निंबाळकर येथे मराठा समाजातील काही तरुणांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासले आहे.
बारामती- निरा रस्त्यावर लावलेल्या एका फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरील बाजूस फोटो होता. संतप्त मराठा कार्यकर्त्यानी त्यास काळे फासले. दरम्यान घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलिस दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या रोषामुळे उपमुख्यमत्री अजित पवार यांना माळेगाव कारखान्यावरील गव्हाण पूजन कार्यक्रम रद्द करावा लागला होता.
COMMENTS