सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाल्हे ; प्रतिनिधी
पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावरील अपघाताचे सञ सुरूच आहे. अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून, या पालखी महामार्गाच्या कामांकडे पाहिले जात असून, पुरंदर तालुक्यातील महामार्गाचे विस्तारीकरण मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहे. मात्र, वाहनांचा वेग आणि अपुरी सुरक्षा व्यवस्थेमुळे, पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच आहे.
पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज (ता.पुरंदर) येथील, भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम विद्यालया समोर कंटेनर व बोलेरो गाडीचा अपघात शनिवार (दि.२८) राञी ११:४५ वाजता झाला. या अपघातात बोलेरो गाडीचा चालक गंभीर जखमी होऊन, मृत्युमुखी पडला.
वाल्हे पोलिस दुरक्षेञातून मिळालेल्या माहितीनुसार, निरा - जेजुरी दरम्यान, दौंडज गावाजवळील विद्यालयासमोर, निरा बाजूकडून, जेजुरी बाजूकडे कंटेनर वाहन क्रमांक एम. एच. २० सी. टी. ६८२० या कंटेनर मधील चालक अरमन मेहदीसहन खान (रा. दर्यापूर, युपी) या कंटेनर वाहनात, पाठीमागील बाजूस, लोखंडी ओढीसी जॉब पार्ट घेऊन, जेजुरी बाजूकडे निघाला होता. दरम्यान, जेजुरी बाजूकडून, फलटण बाजूकडे बोलेरो वाहन क्रमांक एमएच ११ सी. डब्ल्यू ८२१९ जात असताना, कंटेनर वाहनातील पाठीमागील बाजूस असलेल्या, व कंटेनर वाहनांच्या बॉडीच्या बाहेर असलेल्या, लोखंडी ओढीसी जॉब पार्ट ची जोरदार धडक बोलेरो वाहनास बसल्याने, बोलेरो वाहन चालक नरेंद्र नारायण घाडगे रा. काळज (ता. फलटण) हे गंभीर जखमी होऊन, मृत्युमुखी पडले. तर बोलेरो वाहनातील सचिन नंदकुमार बोराटे व दत्तू खंडू सोनकांबळे (रा. कोळकी ता. फलटण) हे किरकोळ व गंभीर जखमी झाले.
दरम्यान, शनिवारी रात्री पाव्हणे बाराच्या सुमारास, हा अपघात झाला. अपघात येवढा भीषण होता की, बोलोरे वाहनाचा वरचा भाग पुर्णपणे कंटेनर वाहनातील पाठीमागील बाजूस असलेल्या लोखंडी जॉबला अडकून कंटेनर वाहन तसेच पुढे निघून गेल्याने,बोलेरो वाहनाला छताचा भागच राहिला नसून, बोलेरो वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या अपघाताचा जोरदार आवाज आल्याने, स्थानिक तरूण या आवाजाच्या दिशेने जाऊन, वाल्हे पोलिस दुरक्षेञातील पोलिस नाईक प्रशांत पवार यांना तात्काळ बोलून घेऊन, अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून जेजुरी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी, दौंडजचे पोलिस पाटील दिनेश जाधव, अक्षय कदम, पांडूरंग गायकवाड, ओमकार गायकवाड, ऋतुराज कदम, अक्षय रोकडे, प्रीतम जाधव आदींनी जखमींना मदत केली.
याबाबतीची तक्रार, वाल्हे पोलिस दुरक्षेञात, दत्तू खंडू सोनकांबळे यांनी कंटेनर वाहन चालक अरमन मेहदीसहन खान यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत, वाहन हायगयीने चालवून, नरेंद्र घाडगे यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन, दोघांना किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत, होऊन, दोन्ही वाहनांचे मोठ्याप्रमाणावर नुकसानास कारणीभूत झाल्याने, याबाबतची फिर्याद, दत्तू खंडू सोनकांबळे यांनी दिली आहे.
या अपघाताचा पुढील तपास, जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलिस दूरक्षेत्रातील पोलीस हवालदार दिपक काशिद करीत आहेत.