Bhor Breaking ! संतोष म्हस्के ! भोरमध्ये झाली सुरवात : मराठा आरक्षणाला पाठिंबा देत कुलदीप कोंडे यांचा पदाचा राजीनामा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संघटक कुलदीप सुदामराव कोंडे रा.केवळडे  ता.भोर यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्हाप्रमुखांकडे पत्र पाठवून पदाचा राजीनामा सोमवार दि.३० दिला.
       समाजातील जागरूक नागरिक म्हणून सर्वसामान्य प्रति आदर राखून आरक्षणाच्या लढ्यात सामील होता यावे तर  मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे या लढ्याला पाठिंबा म्हणून पदाचा राजीनामा दिला आहे.तर भोर शिवतीर्थ चौपाटी येथील बेमुदत साखळी उपोषणास भेट देवून जाहीर पाठिंबा देणार असल्याचे कुलदीप कोंडे यांनी सोमेश्वर रिपोर्टरशी बोलताना सांगितले.
To Top