सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका दूध संघाच्या संचालकपदी मुरूम ता. बारामती येथील कौस्तुभ शरदराव चव्हाण यांची स्वीकृत संचालकपदी निवड झाली आहे.
याबाबत आज अधिकृत घोषणा करण्यात आली. चव्हाण यांनी मागील दूध संघाच्या संचालक मंडळात संचालक म्हणून काम पाहिले होते. त्यांच्यावर पुन्हा एकदा संचालकपदाची जबाबदारी टाकली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या दूध वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
COMMENTS