सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
राज्यातल्या जुन्या गावांना शेकडो वर्षांचा ऐक्याचा-सलोख्याचा ऐतिहासिक वारसा आहे. बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावाने ही पिढ्यानपिढ्या तो जपला आहे. गावात एकविरा देवीचे मंदिर आणि दर्गा शेजारी शेजारी आहे. विठ्ठल मंदिरात भजनासाठी मुस्लिम बांधव जातात तर गावातील पीर साहेब दर्ग्यावर मन्नत मागण्यासाठी हिंदू बांधव जातात. याच सलोख्यामुळे संपत भाई तांबोळी हा भजनी मंडळातला मित्र गेल्यानंतर त्यांच्या शेवटच्या इच्छेखातर चारुदत्त बारवकर व महेश बारवकर या पिता पुत्रांनी पीर साहेब दर्गा चक्क स्वखर्चाने बांधून दिला. हिंदू मुस्लिम ऐक्याची ही बाब सद्यस्थितीत राज्याला आदर्श असून खरा भारतीय वारसा पुढे नेणारी आहे.
समाजामधे जातीय तेढ वाढवणा-या,सोशल मेडीया द्वारे विकृती पसरवणा-या बातम्या, प्रसंगी दंगली घडवणा-या बातम्या वाढु लागल्यात हि चिंतेची बाब आहे . अशातच बारामती तालुक्यात सामाजिक ऐक्य बळकट करणा-या अनेक घटना आहेत.निश्चीतच अनेक गावाना ,आदर्शवत त्या ठरणार आहेत. नुकतीच निदर्शनास आलेली एक घटना आहे ती म्हणजे दोन हिंदु मुस्लीम मित्रांच्या मैत्रीची .
बारामती तालुक्यातील लोणीभापकर हे छोटेसे गाव .ऐतिहासीक पार्श्वभुमी असलेले सुप्याच्या परगण्यातील हे गाव . एक हजार हिंदू कुटुंब आणि जेमतेम २०/२५ मुस्लीम कुटुंबात १०० /११० मुस्लीम लोक या गावात राहतात . गावाला शिव पूर्व काळापासूनचा ऐक्याचा वारसा आहे. सुपे व बारामती या प्राचीन गावात जशी मंदिर-मशीद शेजारी शेजारी आहेत तशाच प्रकारे इथे एकबीरा देवी व पिरसाहेब दर्गा शेजारी आहेत. येथे हिंदु कुटुंबातील चारुदत्त विजयराव बारवकर व मुस्लीम कुटुंबातील संपतभाई उर्फ फकीरमहमद ईस्माईल आत्तार या दोन मित्रांची मैत्री होती . फकिर महमद ईस्माईल आत्तार व चारुदत्त बारवकर व ग्रामस्थ या गावात छोटेशे खातगुण चे ठाण म्हणुन मजार ची पुजा करत असत .छोट्याश्या पत्र्यात ते पुजा करायचे मात्र वादळ वारे आले कि मोठी हानी व्हायची . मुस्लीम मित्राची येथे दर्गा व्हावा हि ईच्छा होती .पण परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हते.मृत्यु शय्येवर असताना संपतभाई ने चारुदत्त बारवकर याना आपली शेवटची ईच्छा येथे दर्गा बांधावा असे सांगीतले. त्याच वेळी बारवकर यांचा मुलगा महेश जो जर्मनी मधे मेकॅनिकल ईंजिनिअर आहे तो सुट्टीवर आला होता .त्याने त्वरीत वडिलाना मी पैसे देतो पण भाईची शेवटची ईच्छा पुर्ण करु व दर्गा बांधुन घेवु असे सांगीतले .खातगुण ला जावुन माहीती घेतली आणी कामाला सुरुवात केली . २०१९ साली साडे चार लाख रु खर्च करुन दर्ग्याचे काम सुरु केले व अतिशय सुबक असा पीरसाहेब राजेवल्ली राजे राजसवार दर्गा उभा राहीला .लोणीभापकर वडगाव रस्त्यावर हा दर्गा उभा आहे .
हिंदु मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या दर्ग्यात नियमीत विविध उत्सव हिंदु मुस्लीम मिळुन केले जातात. ईथे गावच्या यात्रेत जेव्हा भैरवनाथाच्या यात्रे मधे पालखी निघते तेव्हा प्रथम दर्ग्यात आणुन नंतर गाव प्रदक्षिणा घातली जाते .पाडवा झालेवर येथे यात्रा होते. येथील भजनी मंडळात देखील मुस्लीम समाज असतो . येथे भैरवनाथ भजनी मंडळ मधे युनुस भाई तांबोळी,याकुब आत्तार सह आण्णासाहेब गोलांडे ,रमेश गायकवाड ,पोपट भापकर ,दिलीप सकाटे ,कुंभार ई मान्यवर नियमीत भजनाचे कार्यक्रम करतात.जर्मनी तील मुलगा महेश चारुदत्त बारवकर याचे शी दुरध्वनीवरुन संपर्क केला असता "सोमेश्वर रिपोर्टर' शी बोलताना तो म्हणाला आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोबा पासुन गावात आम्ही एकत्र पणे राहीलो पण कधी वाद झाले नाहीत आणी आत्ताच या सोशल मेडीयाने काय जादु केली .जर्मनी मधे देखील बरेच अंशी असे कलुशीत वातावरण दिसते ,त्यामुळे आमचे गाव व आमच्या परंपराना कितीही वादळे आली तरी छेद जाणार नाही असे तो म्हणाला .
एकुणच धोकेदायक वळणावर मने कलुशीत होत असताना हिंदु मित्राने मुस्लीम मित्राच्या ईच्छेखातर बांधलेला दर्गा आदर्शवत ठरत आहे. लोणीभापकर च्या या दोस्तानी नक्कीच सशक्त समाज घडवण्याचे पाऊल उचलले आहे एवढेच म्हणता येईल व सर्व रक्ताचा रंग लालच आहे हे समजुन घेता येईल अशी आशा या घटनेतुन वाटते .