सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
निरा : विजय लकडे
नीरा ता. पुरंदर येथील येथील भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी निरा ते तुळजापूर पायी वारीचे आयोजन नवरात्र उत्सवात केले जाते.
१३ वर्षापूर्वी अवघ्या 30 भाविकांपासून सुरू झालेल्या या पायी वारी उत्सवात आता निरा व निरा परिसरातील २०० भाविक सहभागी झाले आहेत.
भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप धायगुडे यांनी या पायी वारीचे आयोजन गेली तेरा वर्षे अखंडपणे चालू ठेवले आहे.
या पायी वारीचे प्रस्थान यावर्षी दि १५ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता भैरवनाथ मंदिर तक्रारवाडी येथून प्रस्थान होणार आहे. दि. २२ ऑक्टोबर रोजी पायी वारी तुळजापूर मध्ये शेवटचा मुक्काम असणार आहे.
या दिंडी सोहळ्याचे वैशिष्ट्य असे की या सात दिवसात सोहळा ज्या ठिकाणी मुक्कामाला असेल मुक्कामाला असेल त्या ठिकाणी राहण्याचा व जेवणाचा खर्च निरा व निरा परिसरातील अनेक दानशूर व्यक्तीं व भैरवनाथ प्रतिष्ठान मार्फत केला जातो.
निरा व निरा परिसरातील अनेक देवी भक्त यामध्ये तरुणांपासून जेष्ठांपर्यंत सामील होऊन आपापल्या परीने खर्चाचा वाटा उचलत आहेत. भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप धायगुडे स्वतः या पायी वारी सोहळ्यात भाविकांबरोबर सहभागी असतात. या प्रतिष्ठान मार्फत मार्फत या सोहळ्यामध्ये सहभागी भाविकांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येते. यामुळे या पायी वारी सोहळ्याला उस्तवाचे स्वरूप येत आहे.
COMMENTS