सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्ह्यात ऐकिकाळी अग्रगण्य असलेली नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ तसेच सचिव यांनी सहकार कायद्याची अंमलबजावणी केली नसल्याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधक पुणे यांनी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त केल्याची माहिती भोर उपनिबंधक बाळासाहेब तावरे यांनी दिली.दरम्यान हजारो ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणार का? यामुळे ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे.
भोरचे सहाय्यक निबंध बाळासाहेब तावरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन प्रशासक असलेले मंडळ गठीत करण्यात आले आहे. त्यामध्ये शांताराम लक्ष्मण वीर, आत्माराम गेनबा गाडे हे सदस्य आहेत तर प्रशासक मंडळ या पतसंस्थेचा सर्व कागदोपत्री कारभार पाहणार असून एक वर्षानंतर नवीन संचालक मंडळ निवडणूक घेऊन पसंस्थेचा कारभार हाती देण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी त्यांच्या आदेशाने म्हटले आहे.सध्या असणारे संचालक मंडळ अपात्र असणार आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष भास्कर किंद्रे ,उपाध्यक्ष सूर्यकांत शिंदे, संचालक सदाशिव वरें ,सुनील म्हस्के,विजय खळतकर ,रघुनाथ भोसले ,श्रीधर किंद्रे,अजित गायकवाड,उषा तांगडे, छाया फणसे यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.तर सचिव यांच्यावर दंड ठोटावण्यात आला आहे.संस्थेचे लेखा परीक्षण पूर्ण झाल्यावर दोशीवर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात म्हटले आहे.
नेरे पतसंस्थेच्या नेरे,भोर, धनकवडी, नसरापूर ,वेल्हे येथे शाखा आहेत.सभासद संख्या ४ हजार आहे. एकूण ठेवी ३५ कोटी ८५ लाख ९ हजार ३५ रुपये आहेत.दिलेले कर्ज ४२ कोटी ८३ लाख ३८ हजार ८८४ रुपये आहे.नेरे पतसंस्थेवर प्रशासक नेमल्याने ठेवीदार यांचे धाबे दणाणले आहेत.आपली रक्कम कशी परत मिळणार या विवांचनेत ठेवीदार असल्याचे चित्र आहे. ठेवीदार पैसे मागण्यासाठी संस्थेचे उंबरटे झिजवत आहेत.परंतु नंतर काय आहे ते पाहू असे सांगितले जात असल्याने ठेविदारांचा जीव टांगनीला लागला आहे.
COMMENTS