Bhor News ! वरंधा घाटात अपघातांचे सत्र सुरूच : ९० फूट खोल दरीत गाडी कोसळली

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर- महाडला जोडणाऱ्या महत्वाच्या वरंधा घाटात उंबर्डे ता.भोर हद्दीत कार ९० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना कोसळल्याची घटना बुधवार ता.१८  दुपारच्या दरम्यान घडली असून सुदैवाने गाडीत कोणही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.मात्र घाटात अपघाताचे सत्र सुरूच आहे.
        मिळालेल्या माहितीनुसार भोर मार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातील उंबर्डे (ता.भोर) गावच्या हद्दीत गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.चालकाने गाडी रस्त्याच्या उतारावर बाजूला उभी करून गाडीतील चालकासह तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले.परंतू अचानक गाडी उताराने पुढे जाऊन दरीत कोसळली. सुदैवाने गाडीत कुणी नसल्याने अनर्थ टळला.मात्र यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रथमदर्शी अक्षय धुमाळ यांनी सांगितले.याबाबत भोर पोलिस ठाण्यात अद्याप पर्यंत अपघाताबाबत कोणतेही नोंद करण्यात आली नसल्याचे भोर पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.
To Top