सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण करून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी दि.२० ऑक्टोबर रोजी बारामतीत सभा होणार आहे. बारामती शहरातील तीन हत्ती चौक याठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. आता जरांगे पाटील यांची तोफ बारामतीत धडाडणार असून, या सभेची जय्यत तयारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे
अंतरावली सराटी येथील सभेनंतर जरांगे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यात सभा होणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती शहरात तीन हत्ती चौक याठिकाणी दि २० ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता सभा होणार आहे. बारामती नगरपालिकेच्या इमारतीसमोर असलेल्या चौकात ही जाहीर सभा होणार असल्याने सभेसाठी ही जागा तोकडी पडणार आहे.
------------------------
बारामती ची सभा उरकल्यानंतर जरांगे पाटील यांची सभा दि. २० ऑक्टोबर रोजीच फलटण शहरात सायंकाळी ५ वाजता शिवाजी महाराज चौकात पार पडणार आहे.
---------------------
मनोज जरांगे पाटील शनिवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी इंदापुरात येणार आहेत. प्रशासकीय भवनाशेजारच्या पटांगणात त्यांची जाहीर सभा होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सभेचे करण्यात आले आहे.
COMMENTS