सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील खानापूर ता.भोर येथे रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करून गावात मांस विकताना एक जण वनविभागाच्या जाळ्यात सापडला असल्याची घटना गुरुवार दि.२६ घडली.
पारधी समाजाच्या टोळीने खानापूर परिसरात रानडुक्कर या वन्य प्राण्याची शिकार केली होती.काही वेळाने या डुक्कर प्राण्याचे मांस तीन ते चार जण खानापूर येथे विक्री करत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ सापळा रचून खानापूर येथे शिकार करणाऱ्या टोळीतील एका तरुणाला ताब्यात घेतले.तर इतर दोन जणांनी पलायन केले.पुढील तपास पुणे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहाय्यक वनरक्षक श्रीमती शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजीराव राऊत, वनपाल एस.आर.खट्टे,वनरक्षक पी.डी .गुट्टे व एस.के.होनराव, के.पी.देठे,व्ही.आर.आढागळे.के. एस.हिमोने करीत आहेत.
COMMENTS