सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वडगाव निंबाळकर : सुनील जाधव
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलन बालेवाडी पुणे या ठिकाणी झालेल्या विभागस्तेरीय मैदानी स्पर्धेत स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर मधील खेळाडूंनी यश संपादन केले.
यश संपादन विद्यार्थ्यांची चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 4*400 धावणे रिले या स्पर्धेमध्ये 17 वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यां अनिता ठोंबरे, सध्या ठोंबरे,वनिता ठोंबरे,श्रुती गायकवाड, पौर्णिमा खोमणे. तसेच 19 वर्षे वयोगट विद्यार्थ्यांमध्ये हॅमर थ्रो या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आयन अमजद शेख या खेळाडूने पटकावला आहे. या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक चौगुले सर, निलेश दरेकर सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालाचे पर्यवेक्षक पाबळ सर व ग्रामपंचायत सदस्य प्रमोद किर्वे , किर्वे मॅडम,सुनील खोमणे,संतोष भोसले यांनी अभिनंदन केले.