सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात भारत सरकारच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक असणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेची कार्ड काढण्यासाठी काही गावांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने तालुका भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी मोफत असतानाही काही ग्रामपंचायतमध्ये बाहेरील एजन्सीमार्फत ३० ते २०० रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात आहे. हे निदर्शनास आले असल्याने आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात होणार गैरव्यवहार थांबवावा या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांना निवेदन देण्यात आले.तर आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी घेण्यात आलेले पैसे लाभार्थींचे परत देण्यात यावेत असेही गटविकास अधिकारी यांना सूचित करण्यात आले.अमर बुदगुडे भोर तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे,उपाध्यक्ष अमोल पिलाने,सौरभ राऊत उपाध्यक्ष भोर तालुका विद्यार्थी आघाडी रोहन खोपडे उपस्थीत होते.
COMMENTS