पुरंदर ! विजय लकडे ! मुलांच्या शाळेला सुट्टी ...तर मुलींची शाळा दिवसभर सुरू : नीरा येथील प्राथमिक शाळेमध्ये सावळा गोंधळ

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा - विजय लकडे
निरा (ता.पुरंदर) येथे  मुलांची व मुलींची प्राथमिक  शाळा आहे.सोमवार (२३ ऑक्टोबर) रोजी मुलांचे शाळेला दुपारी एक वाजता सुट्टी देण्यात आली. मात्र मुलींची शाळा सकाळी दहा ते पाच पर्यंत घेण्यात आली.
एकाच व्यवस्थापनाच्या व एकाच ठिकाणी भरत असलेल्या या मुला-मुलींच्या शाळेमध्ये कधी नव्हे तो असा बदल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
            एकाच कुटुंबातील  भाऊ व बहीण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत.मात्र अनेक पालक  मुलाला न्यायला आल्यावर मुलीला मात्र बरोबर घेऊन जाऊ शकले नाहीत. त्यामुळे पालकांना आश्चर्य वाटले. याबाबत पालकांनी चौकशी केली असता, शिक्षकांची दरमहा होणारी शिक्षण परिषद मांडकी येथे असल्यामुळे मुलांच्या शाळेला दुपारनंतर सुट्टी देऊन सर्व शिक्षक जिल्हा परिषद शाळा मांडकी येथे गेल्याचे समजले.
        मात्र,मुलांच्या शाळेतील शिक्षकांना शिक्षण परिषद आहे.आणि मुलींच्या शाळेतील शिक्षकांना शिक्षण परिषद का नाही ? असा प्रश्न पालकांना पडला.
याबाबत पालकांनी माहिती घेतली असता प्रभारी मुख्याध्यापक सुनिल पवार यांनी मुलींच्या  शाळेतील शिक्षकांना शिक्षण परिषदेला उपस्थित राहू नये. अशा सूचना दिल्याने शिक्षकांना शिक्षण परिषदेला उपस्थित राहता आले नाही.व मुलींची शाळा सकाळी दहा ते पाच या वेळेत घ्यावी लागली.
मात्र यामुळे दोन पाल्य असलेल्या पालकांची गैरसोय झाली. व दुपारी मुलाला न्यायला व संध्याकाळी परत मुलीला न्यायला यावे लागल्याने धावपळ झाली.
शिक्षण विभागातील या सावळ्या गोंधळामुळे पालकांना मात्र वेठीस धरण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.
-- ---------------------
 "जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून दरमहा शिक्षकांच्या शिक्षण परिषदा घ्याव्यात असा आदेश असल्याने सकाळी दहा ते एक पर्यंत शाळा घेवून दुपारी दोन ते पाच या वेळेत शिक्षण परिषदेचे आयोजन जिल्हा परिषद मांडकी येथे करण्यात आले होते.याबाबत याबाबत व्हाट्सअप ग्रुप वरुन सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार निरा क्रमांक दोन शाळा वगळता नीरा केंद्रातील इतर सर्व शाळेतील शिक्षक शिक्षण परीक्षेसाठी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा निरा नंबर दोनचे शिक्षक शिक्षण परिषदेसाठी का उपस्थित राहिले नाहीत याबाबत मला मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोणतीही कल्पना दिली नाही. याबाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पुरंदर यांच्याकडे पाठवणार आहे."
भाऊसाहेब नाझीरकर
 प्रभारी केंद्रप्रमुख - निरा.
To Top