सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव येथील डॉ. प्रविण यादव यांची पीएच. डी नंतर असणारे संशोधन म्हणजेच Post Doctorate या अभ्यासक्रमासाठी भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद मान्यताप्राप्त इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स अँड इकॉनॉमिक चेंज, बंगळुरू या संस्थेत निवड झाली आहे.
सदर अभ्यासक्रमासाठी त्यांनी निवडलेल्या "Exploring the Socio-Economic Status of Seasonal Migrant Sugarcane Harvesting Workers" या विषयाला संशोधन समितीकडून मान्यता देण्यात आली आहे. डॉ. प्रविण यादव यांनी यापूर्वी २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठातुन पीएच. डी पदवी पूर्ण केली आहे तसेच त्यांनी कायद्याची पदवी देखील प्राप्त केली आहे.
COMMENTS