सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणा-या इसमाच्या वाई पोलीसांनी आवळ्या मुसक्या
तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व मोटारसायकलसह सव्वादोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत केला आहे.
सदर गुन्ह्यात पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणारा दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी किसनवीर चौक वाई येथे येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बाळासाहेब भरणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे यांस बातमी प्राप्त झाल्याने, त्यांनी किसनवीर चौक येथे सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेण्याच्या सुचना तपास पथकातील अधिकारी अंमलदार तसेच वाहतुक अंमलदार यांना दिल्याने किसनवीर चौक येथे सापळा रचुन एका इसमास मोटार सायकल क्र एमएच ११ डीई ६१९९ सह ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारता त्याने आझाद अली सय्यद रा श्रीरामपुर ता श्रीरामपुर जि अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्याचेकडे अधिकची विचारपुस करता, त्याने वाई शहरात बडोदा बँकेसमोर, सातारा पोलीस असल्याची बतावणी करुन, फसवणुक केल्याची कबुली दिल्याने, त्यास पुढील तपासकामी अटक करुन त्याचेकडे सखोल विचारपुस करता, तो फसवणुक करुन नेहलेल्या मुद्देमालांबाबत काहीएक उपयुक्त माहिती देत नसल्याने त्यास वरिष्ठांचे परवानगीने / मार्गदर्शनाखाली तपासकामी श्रीरामपुर ता श्रीरामपुर जि अहमदनगर येथे घेऊन जाऊन त्याचेकडुन तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व मोटारसायकलसह सुमारे सव्वा दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी बाळासाहेब भरणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक सुधिर वाळुंज, पोलीस हवालदार राहुल भोईर, अजित जाधव पोलीस अंमलदार गोरख दाभाडे हेमंत शिंदे श्रावण राठोड, नितीन कदम, प्रेमजीत शिर्के, रुपेश जाधव, रामदास कोळेकर, अजित भोसले स्नेहल सोनवणे यांनी केली आहे. पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी वाई पोलीसांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS