सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील पाले ता.भोर येथील सूर्यकांत दत्तात्रय पोळ यांना महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीतर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल २०२३ चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने रविवार दि.८ पुणे येथे संभाजीनगरचे आमदार विक्रम काळे व पुणे जिल्हा शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आजगावकर यांच्या हस्ते येथे सन्मानित करण्यात आले.
पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे येथील आदर्श विद्यार्थी ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सूर्यकांत पोळ यांची भोर तालुक्यातून आप्तेष्ट तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.२० वर्ष सूर्यकांत पोळ यांनी ध्येयवेडे होऊन शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थी उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे पदाधिकारी तसेच पाले ग्रामस्थ उपस्थित होते.