सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील वेताळपेठ येथील उच्चशिक्षित घरातील शुभम दीपक मोरे अभियांत्रिकी शाखेतील मास्टर ऑफ सायन्स या उच्च शिक्षणासाठी भारतातून इंग्लंडला रवाना झाला आहे.भोर तालुक्यातून शुभमचे आप्तेष्ट,मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे.
शैक्षणिक दृष्ट्या विकसित असलेल्या भोर तालुक्यातील शुभम मोरे इंग्लंड देशातील लंडन शहरात बृनेल युनिव्हर्सिटीला शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरला आहे.त्याचे बारावी पर्यंतचे शिक्षण भोर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे झाले असून डिग्रीचे शिक्षण अभियांत्रिक विद्या सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे येथे त्याने पूर्ण केले. शुभमची आई भारती मोरे भोर नगरपरिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापिका असून वडील दीपक मोरे शिंद येथील विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.
COMMENTS