सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
शिक्षकांना शालाबाह्य बहुतांशी काम करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा घसरला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. शासनाच्या या धोरणांमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे आम्हाला शिकवू द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने २ ऑक्टोबर राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाची हाक दिले आहे. या आक्रोश महामोर्चात भोर तालुक्यातील ५०० हून अधिक शिक्षक,शिक्षिका सामील होणार असल्याचे माहिती भोर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदाम ओंबळे यांनी दिली.
भोर येथे आक्रोश महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिक्षक बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी महानगरपालिका व नगरपालिका राज्याचे कार्याध्यक्ष सचिन इंगळे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष पोपट निगडे, तालुका संघटनेचे माजी अध्यक्ष आप्पा सावंत, भीमराव शिंदे, पंडित गोळे, बापू जेधे, संदीप दानवले, विठ्ठल दानवले, अनंता आंबवले, राजेंद्र चव्हाण,विकास खुटवड, मनोजकुमार पुरंदरे, प्रदीप बदक अरविंद बढे आदींसह शेकडो शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
COMMENTS