सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील नेरे-पाले ता.भोर महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावरील नेरे येथील ओढ्यातील पुलाचा भरावा मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले.तर पुलावर पाण्याचे मोठे तळे साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.परिणामी अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भोर तालुक्याचे दक्षिण व पश्चिम पट्ट्यात मागील तीन दिवसांपासून अतृष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या अतिवृष्टीत खरिपातील भात पिकांना संजीवनी मिळाली असली तरी बहुतांशी शेतकऱ्यांची कडधान्य पिके पावसात भिजल्याने वाया गेले आहेत. तर अनेकांच्या शेताच्या ताली पडल्याचे चित्र आहे. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस झाल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे या पावसात तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्याच्या पुलांचे भरावे वाहिले आहेत तर ठिकठिकाणी पूलांवर पाण्याची तळी साचली आहेत.यामुळे वाहनचालकांची प्रवास करताना कोंडी होत आहे.संबंधित विभागाने वाहतुकीच्या रस्त्यावरील पुलावरील पाण्याची साचलेली तळी तसेच मोठे वाहून गेलेले भराव तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
COMMENTS