भोर ! संतोष म्हस्के ! 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या वृत्ताची दखल : भोर-मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिंड घाटातील राडारोडा हटवला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर- मांढरदेवी मार्गावरील आंबाडखिंड ता.भोर घाटात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दगड,गोटे,माती वाहून आले होते. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या- येणाऱ्या वाहनचालक तसेच प्रवाशांना कसरत करावी लागत होती.याचे वृत्त सोमेश्वर रिपोर्टरने प्रसिद्ध केले होते. सोमेश्वर रिपोर्टरच्या वृत्ताची दखल घेत तात्काळ काही तासात सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्त्यावर वाहून आलेला राडारोडा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
       घाट रस्त्यावर आठ ते दहा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या लोंढ्यामुळे राडाराडा वाहून आला होता.प्रवासी तसेच वाहनचालकांना  राडाराड्यातून कसरत करून वाहने बाहेर काढावी लागत होती. परिणामी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी योगेश मेटेकर व कर्मचारी प्रकाश जाधवर यांनी संबंधित रस्त्याच्या ठेकेदारास सूचना देऊन तत्परतेने रस्त्यावरील दगड, माती,गोटे बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला गेला.
To Top