सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
नीरा-बारामती रस्त्यावर कोऱ्हाळे ते कटिंगपूल दरम्यान ओमीनी झाडाला धडकून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. चारच दिवसांपूर्वी होळ येथे ओमीनी झाडाला धडकून कोऱ्हाळे येथील आठ युवक जखमी झाले होते.
सर्व जखमी ओझर्डे ता. वाई येथील असून ते एमएच ११ सीजी ८६२६ या ओमीनी गाडीतून लतींगे कुटुंब तुळजापूर येथे देव दर्शनासाठी गेले होते. देव दर्शनावरून परतताना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकून सहा जण गंभीर तर ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात सचिन लतींगे वय-४५, वैशाली लतींगे वय ४१, मंगल लतींगे वय ६५, प्रदीप लतींगे वय ३६, वर्षा लतींगे वय २६, यश लतींगे वय १८, रिया लतींगे वय अडीच वर्षे, श्रावणी लतींगे वय ७ वर्ष हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सोमेश्वरनगर येथील साई सेवा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
COMMENTS