सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२१-२०२२ सुरू झाला त्या नंतर कार्यक्षेत्रामध्ये ऊस जळीत होण्याच्या घटना होऊ लागल्या. सस्तेवाडी गावातील कदम वस्ती या ठिकाणी आपल्या कारखान्याचे सभासद सतीश हरीभाऊ कदम यांचा ऊस महावितरणच्या वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे जळीत झाल्याचे पाहणी केल्या नंतर समोर आले होते. याप्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी पाठपुरावा करून संबंधित शेतकऱ्याला दोन लाखांची मदत मिळवून दिली.
सोमेश्वर कारखान्याच्या पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक ऋषीकेश गायकवाड यांचा सत्कार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिती खोमणे यांच्यासह सर्व संचालक व सभासद हजार होते.
कारखाना गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी २० दिवस अगोदर सस्तेवाडीचे सभासद आनंदराव जगन्नाथ टकले यांचाही दोन एकर ऊस याचं कारणाने जळीत झाल्याचे समजले. या दोन्ही घटना लक्षात आल्या नंतर संचालक ऋषीकेश गायकवाड हे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून या प्रकरणांची नुकसान भरपाई शेतकऱ्याला देण्यात यावी अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी सांगीतले आणि कागद पत्रांची पूर्तता केल्यानंतर जर महावितरण जबाबदार असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगीतले.
त्या नंतर ३० नोव्हेंबर २०२१ पासून सभासदांना बरोबर घेऊन कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी सुरवात केली. याचा पूर्ण पने आम्ही पाठपुरावा करून आम्ही ३ जानेवारी २०२३ मधे आपल्या कारखान्याचे सभासद श्री.आनंदराव जगन्नाथ टकले यांना महावितरण कंपनी कडून २ लाख ११ हजार ७९७ रुपये मंजूर झाले.
---------------
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सन्मान करून सभासद जनतेकडून कडून कामाची पावती----ऋषीकेश गायकवाड : संचालक सोमेश्वर कारखाना
आपण मागील वर्षीच्या हंगाम दरम्यान श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद व सस्तेवाडी गावचे आनंदराव जगन्नाथ टकले यांच्या ऊस जळीताच्या प्रकरणामध्ये महावितरण कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रुपयांची मदत मिळवून दिली होती. सभासद म्हणून तसेच शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या तळमळीतून केलेल्या या कामाची पावती म्हणजेच श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये सभासदांसमोर टकले यांच्या हस्ते आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुक्याचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते माझा सन्मान केला. आपण केलेलं काम कायम जिवंत राहत असतं याची प्रचिती आली.