भोर ! आंबाडखिंड घाटात धुव्वाधार पाऊस : रस्त्यावरील राडारोडयाने वाहनचालकांची घाटातून प्रवास करताना कसरत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर- मांढरदेवी मार्गावरील आंबाडखिंड ता.भोर घाटात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दगड, गोटे, माती वाहून आल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालक तसेच प्रवाशांची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.लवकरात लवकर रस्त्यावर आलेला राडाराडा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी वाहन चालकांकडून संबंधित विभागाकडे होत आहे.
       घाट रस्त्यावर आठ ते दहा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या लोंढ्यामुळे राडाराडा वाहून आला आहे.प्रवासी तसेच वाहनचालकांना जाताना- येताना या राडाराड्यातून कसरत करून वाहने बाहेर काढावी लागत आहेत.लवकरात लवकर आंबाडखिंड घाटातील वाहतुकीच्या रस्त्यावरील राडाराडा बाजूला केला नाही तर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
                                         
To Top