सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या व्यवस्थापन मंडळाला बारामती शिवसेना शिष्टमंडळाने पत्र देत दिवाळीसाठी सभासदांना ३० किलो साखर देण्याची मागणी केली. शिवसेना शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन कारखान्याचे सचिव कालिदास निकम यांना दिले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ यांच्याकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त प्रत्येकी सभासद ३० किलो साखर वाटप केले जात होते. परंतु यावर्षी संचालक मंडळाने अजब निर्णय घेऊन प्रत्येकी सभासद १० किलो साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला. यामुळें परिसरातील सभासद यांच्या मध्ये नाराजी पसरली आहे. यामुळें शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने यांच्या नेतृत्वात उप तालुका प्रमुख सुदाम गायकवाड, विभाग प्रमुख बंटी गायकवाड, वडगांव निंबाळकर चे शाखा प्रमुख नितीन गायकवाड, शिवसैनिक तानाजी गायकवाड, दिनकर कदम, विलास जाधव यांच्या उपस्थितीत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी तत्काळ प्रत्येकी सभासद ३० किलो साखर वाटप पूर्ववत करावे.अन्यथा शिवसेना येत्या दीपावली पाढव्याला बोंबांबोंब आंदोलन करणार आहे.