सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
इंस्टाग्राम लाईव्ह सुरू असताना अचानक मेसेज आला
नमस्ते नाना, मी अमेरिकेमधून बोलतोय... तस मी मूळचा कोल्हापूरचा आहे.. पण कामासाठी अमेरिकेमधे असतो. कामाच्या लोड मध्ये वेळ मिळाला की मी तुमचे विडियो बघत असतो.. आम्ही सगळे आमचा दिवासभराचा तान विसरून जातो जेव्हा तुमचा नाना चा विडियो इंस्टाग्रामला दिसतो
हो, हो. . . हे घडलंय आपल्याच परिसरातील प्रसिद्ध युवा अभिनेता आकाश भापकर सोबत.. पण कोण आहे हा आकाश भापकर? आणि हा काय प्रकार आहे? तर मित्रांनो, आजकाल आपण पाहतो की तरुणांमध्ये अभिनय क्षेत्राची प्रचंड ओढ आहे. याच ओढीपोटी कित्येक तरुण-तरुणी स्वप्नांची नगरी मुंबई इथे येत असतात. स्वप्नांची नगरी असणाऱ्या या मायानगरीमधे आलेल्या या तरुणांमध्येच दडलेले असतात कित्येक शाहरुख, कित्येक सलमान, कित्येक अमीर आणि अजय देवगण. कित्येकांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या या मायानगरीमधे विस्कटलेली स्वप्न घेऊन बरेच तरुण आयुष्याचा रस्ता तुडवत गावचा रस्ता धरत असतात. अश्याच तरुणांपैकी एका तरुणाची म्हणजेच आपल्या बारामती तालुक्यातील चौधरवाडी या छोट्या गावातल्या आकाश पांडुरंग भापकर या तरुणांची ही गोष्ट.
कॉलेजच्या दिवसांमध्ये असताना अभिनयाचा कसला अनुभव नसलेल्या आकाशने एका अतिशय छोट्या नाटकात छोट्या भूमिका केली. ही नाटकातली भूमिका छोटी असली तरीही त्याच्या मनाला या क्षेत्राची ओढ लावण्यासाठी पुरेसी होती. आता याच क्षेत्रात करियर करण्याच ठरवलेल्या आकाशने त्याच्या करीयरच्या सुरुवातीला काही मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या. परंतु या क्षेत्रामधील अनियमितता व सामान्य कुटुंबांधील तरुणांना अशक्य असणारी वाट पाहून स्वतःच नवीन काहीतरी सुरू करण्याचे हेतूने त्याने तरुणांच्या हातामध्ये असणाऱ्या मोबाईलचा व मोबाईल मधे असणाऱ्या सोशल मिडियाच्या माध्यमातून काम सुरू करण्याचे ठरवले व आज महाराष्ट्राच्या गावागावातील तरुणांच्या आणि प्रौढांच्या चर्चेमधला विषय बनला आहे.
आकाशची सोशल मेडियावर सुरुवात झाली ती थोर अभिनेत्यांच्या थोर चित्रपटातील चोर संवादांपासून. हो, हो, चोर संवादांपासूनच म्हणजे मोठ्या पिक्चरमधल्या फेमस प्रसंगांचा रिमेक करून. सोशल मेडियावर त्याला Spoof विडियो म्हणतात. आकाशचा असाच अभिनयाचा उत्तम नमूना म्हणजे त्याने साकारलेला कांतारा चित्रपटातला क्लायमॅक्स सीन. जितक्या वेळा पाहावं तितक्या वेळ आश्चर्य चकित करणार त्याचा हा विडियो इंस्टाग्राम व यूट्यूबवर प्रचंड गाजला आणि जाणकारांकडून नावाजला सुद्धा गेला. त्याने मुळशी पॅटर्न, कांतारा, विक्रम वेध, दगडी चाळ यांसारखे अनेक Spoof विडियो केले तरीसुद्धा आकाशच्या या प्रयत्नांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही त्याने अभिनयाचा नाद सोडून न देता स्वतःचं आरिजिनल काहीतरी करून बघावं अस म्हणत गावतीलच काही मित्रांना सोबत घेऊन स्वतःच संवाद लिहले, दिग्दर्शन व चित्रीकरण केलं यावेळी त्याला उपयोगी पडलं ते रिमेक विडियो बनवताना केवळ सोशल मिडिया आणि युट्यूब वरुन पाहून विकसित झालेली विडियो बनविण्याची आणि इंस्टाग्राम वापरण्याची कौशल्ये.
आकाशने इंस्टाग्राम रीलच्या माध्यमातून साकारलेली एकदम गावरान पात्रं, त्यांच्यातला गावठी संवाद आणि शिवराळ बोलीच्या जोरावर महाराष्ट्राच्या गावागावा मधे आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. त्याच्या विडियो वर चांगले लाईक्स कोंमेंट्स येऊ लागल्या लोक त्याला कोंमेंट्स मधून व मेसेजेस मधून पुढचा भाग कधी येणार अस् विचारू लागली. आणि हळू हळू त्याची प्रसिद्धी वाढतच गेली. त्याचे काही विडियो एक कोटींपेक्षा अधिक वेळा पहिले गेले. त्याने अशी पात्र लिहिली जी प्रत्येक गावात असतातच जस की, त्याच्या दादा या सिरीज मधल दादाच पात्र म्हणजे नुसत्या बढाया मारणारा एक नेता, तात्या म्हणजे गावातील एक दारूच्या व्यसनाधीन असणारा आणि जो दिसेल त्याला दहा रुपये मागणार एक माणूस आणि सर्वत्र प्रसिद्ध झालेला नाना म्हणजे प्रत्येक वाक्यासोबत एक शिवी हासडणारा एक खडूस माणूस. आत्ता नुकतेच त्याने नव्याने सुरू केलेली चकवा ही भयकथांची सिरीज सुद्धा भाव खातेय.
तुमच्या सर्वांच्या मनात आता विचार आला असेल ना की हे सगळ खरंय पण या सगळ्या कामात आकाशच कमवण्याच साधन काय? तर त्याच उत्तर अस आहे की, आजकाल इंस्टाग्रामवरती आपल्या व्यवसायाची जाहिरात केल्यावर व ती जाहिरात जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचल्यावर आपल्या व्यवसायाला गती मिळतेय हे सर्वांनाच माहिती आहे. नेमक हेच लक्षात घेऊन आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून आकाश आपल्या भागातील लोकांच्या व्यवसायाची जाहिरात करतो ज्यामधून त्याला काही पैसे मिळतात तसच तो आता युट्यूब च्या माध्यमातून सुद्धा सक्रिय होऊन स्वतःच्या कलेला अर्थाची जोड देतोय.
आकाशला विचारल असता तो सांगतो की त्याच्या या यशामद्धे आकाशचे जेवढे प्रयत्न आहेत, कष्ट आहेत तेवढेच कष्ट त्याचे मित्र शेखर पाटोळे, अभिषेक गायकवाड, स्वरूप भिलारे, गौरव गाडेकर व इतर सहकार्यांचे आहेत. आकाशच आत्ता सध्या काही डॉक्युमेंट्रिज, छोटे नाट्यसंवाद व काही शॉर्ट फिल्म संदर्भातील काम सुरू आहे. लवकरच तो हे सर्व सादरीकरण आपल्यासमोर करेल आणि आपल्या परीसराच नाव सर्वदूर पोहचवेल यात काहीच शंका नाही. आकाशला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी सोमेश्वर रिपोर्टर कडून खूप खूप सदिच्छा!!
आकाशचा इंस्टाग्राम अकाऊंट आय डी: @akashbhapkar_vines
यूट्यूबची लिंक: https://youtube.com/@akashbhapkar_vines2541?si=YZha3xVpJSd9LBZM