सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : सुनील निंबाळकर
रा.प. महामंडळा मार्फत सुरु असलेल्या "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक" अभियान अंतर्गत सातारा विभागातून आलेल्या समितीने आज बारामती आगारा अंतर्गत असलेले निरा,सुपा,मोरगाव, वडगाव निंबाळकर, पणदरे, माळेगाव,कसबा,बारामती एम आय डीसी, भवानीनगर या बस स्थानकांची पाहणी केली. सदर अभियानाचा उद्देश प्रवाशांना रा.प.महामंडळामार्फत चांगली सेवा मिळून त्यामुळे प्रवासी वर्ग रा.प.महामंडळाकडे आकर्षिला जावा हा आहे.त्यामध्ये बसस्थानकावर प्रवाशांसाठी असणाऱ्या सुख सुविधा पुरविल्या आहेत का याबाबत तपासणी करण्यात आली.सुलभ शौचालय व्यवस्था ,बसस्थानकाला रंगरंगोटी , बस स्थानकावर वृक्षारोपण , स्वच्छ बसस्थानक प्रवाशांसाठी मार्गदर्शक सुचणा तसेच रा.प.महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या सवलती बसस्थानकावर प्रदर्शित केलेल्या आहेत का याबाबत तपासणी करण्यात आली.चालक वाहक याना विश्रांतीसाठी विश्रांती गृह इत्यादी आहेत की नाही याची तपासणी केली तसेच या समितीचा अभियानाचा उद्देश बस बस स्थानकामध्ये प्रवाशांची गैरसोय होणार नाही व स्वच्छ सुंदर बसस्थानक प्रवाशांना देण्यासाठी काळजी घेणे हा आहे.
या समितीमध्ये सातारा विभागाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे , रेश्मा गाडेकर कामगार अधिकारी, आदेश माने सांख्यिकी अधिकारी, सुनील निंबाळकर पत्रकार म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर या सर्वांची माहिती बारामती आगार व्यवस्थापक वृषाली तांबे मॅडम तसेच घनश्याम शिंदे वाहतूक निरीक्षक यांनी दिले.
COMMENTS