सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आयोजित शौर्य जागरण यात्रा मंगळवार दि.१० भोर शहरातील बसस्थानक परिसरात पोहोचताच हिंदुत्ववादी संघटनांनी शौर्य जागरण यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.
३५० वा शिवराज्याभिषेक दिन आणि विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्याने शिवनेरी ते सिंहगड या मार्गावर शौर्य जागरण यात्रा काढण्यात आली.किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी दि.१४ शौर्य जागरण यात्रेचा समारोप होणार आहे.फुलांची आकर्षक सजावट केलेल्या चारचाकी वाहनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश मूर्तीचा रथ शहरातील एसटी स्टँड परिसरात दाखल होताच नैसर्गिक फुलांची उधळण तसेच फटाके फोडून शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान हिंदुस्थान,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,बजरंग दल,गोरक्षक संघटना तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला.यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष गणेश आखाडे,महामंत्री हरिभाऊ देवकर,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव,नाना सावंत,गोरक्षक उमेश म्हेत्रे,अमित साबळे, रणजित खोपडे, सोमनाथ ढवळे,सुनील खळदकर,अक्षय पवार,गणेश बारंगळे,अमेय पाटणकर अथर्व गिरे,पोलीस हवालदार दत्तात्रय खेंगरे,विकास लगस,उद्धव गायकवाड, शौकत शेख तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS