Bhor News ! भोर टपाल खात्याकडून वित्तीय सशक्तिकरण दिन साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी 
वित्तीय सशक्तिकरण दिनाचे औचित्य साधून भोर टपाल खात्याकडून मंगळवार दि.१० वित्तीय सशक्तीकरण दिन नगरपालिका सभागृहात साजरा करण्यात आला.यावेळी भोर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रतिसाद दिला.
       पुणे ग्रामीण टपाल विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर विभागाच्या सहाय्यक अधीक्षक नाजनीन पठाण यांच्या उपस्थितीत व ग्रामीण डाक सेवक यांच्या मदतीने वित्तीय सशक्तीकरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी सहाय्यक अधीक्षक नाजनीन पठाण, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, मेल ओव्हर्सल विलास जेधे, भोरचे पोस्टमास्तर चेतन खराडे, सचिन ठाकूर यांच्यासह ग्रामीण डाक सेवक संतोष बुदगुडे, चंद्रकांत डाळ, सुभाष साळेकर ,साहेल मनेर, प्रज्ञा चौगुले, वैशाली जेधे, सविता भागवत, सुजाता कोंढाळकर, पोपट गोळे,दिलीप खोपडे, कांचन कठे, रुतिजा नरवटे  होते.
To Top